नाशिक: ‘अमृत’ च्या लक्षित गट परिवार सर्वेक्षणाचे जिल्ह्यात आयोजन

नाशिक। दि. ७ एप्रिल २०२६: अमृतच्या विविध योजना विद्यार्थी, तरूण महिला, व्यावसायिक, शेतकरी यांच्यासाठी आहेत. या योजना लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रात लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वक्षण करण्यात येत आहे. हे अभियान नाशिक जिल्ह्यात 8 ते 25 एप्रिल 2026 रोजी राबविण्यात येणार आहे यासाठी लक्षित गटातील कुटुंबांनी नोंदणी करावी, असे आवाहन अमृतचे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  घरफोडीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; सोन्या-चांदीसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अमृतच्या लक्षित गटात सद्यस्थितील ब्राम्हण, सिंधी, मारवाडी, गुजराथी, पटेल, राजपूत, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/ वैश्य इत्यादी जातींचा समावेश होतो. सर्वेक्षण कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क करून या गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडून समाजाची माहिती घेणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

अधिक माहिती साठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), नाशिक जिल्हा कार्यालय, बेसमेंट, अपूर्वा एव्हेन्यू , टिळकवाडी , नाशिक -422002, जिल्हा कार्यालस संपर्क क्रमांक 912228770 अथवा जिल्हा समन्वयक संजय गोसावी – 88570773911 ( सिन्नर, दिंडोरी, निफाड, बागलाण, चांदवड, देवळा, पेठ, सुरगाणा व कळवण तालुक्यासाठी) अमृत मित्र मयूर हातवळणे- 8830046256 (नाशिक शहर व तालुका, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर साठी) अमृत मित्र अजिंक्य कन्नल – 9665692676 ( मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यासाठी) तसेच https://mahaamrut.org.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही विभागीय व्यवस्थापक श्री खाडिलकर यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790