नाशिक: इंडिया स्किल्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र युवक-युवतींनी ऑनलाईन नोंदणी करावी

नाशिक। दि. २ सप्टेंबर २०२६: इंडिया स्किल्स ही देशातील प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धा असून, विविध व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य क्षेत्रातील युवकांना आपले कौशल्य, गुणवत्ता व प्राविण्य प्रदर्शित करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होते. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील पात्र व इच्छुक युवक-युवतींना इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ मध्ये सहभागी होण्यासाठी www.skillindiadigital.gov.in/india-skills या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, वि. रा. रिसे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन...

या स्पर्धेचे आयोजन कौशल्य विकासाशी संबंधित विभाग, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल काउन्सिल तसेच विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. स्पर्धेत ६३ हून अधिक कौशल्य क्षेत्रांचा समावेश असून, त्यात रोबोटिक्स, मेकाट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, ग्राफिक डिझाइन, ३डी डिजिटल गेम आर्ट, बेकरी, ऑटोमोबाईल तंत्रज्ञान, कुकिंग, वेल्डिंग, ब्युटी थेरपी आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदी कौशल्यांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर बेकायदा वृक्षतोड; महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

या स्पर्धेसाठी पात्रता व निकषानुसार उमेदवाराचे वयोमर्यादा सामान्यपणे 23 वर्षापर्यंत असावे. उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. उमेदवाराचे किमान वय १६ वर्षे असावे. सायबर सिक्युरिटी, मेकाट्रॉनिक्स, इंडस्ट्री ४.०, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डिजिटल कन्स्ट्रक्शन, एअरक्राफ्ट मेंटेनन्स आणि वॉटर टेक्नॉलॉजी यांसारख्या निवडक हाय-टेक कौशल्यांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 18 सप्टेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

इच्छुक उमेदवारांनी स्किल इंडिया डिजिटल हब पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन केल्यानंतर आधार आधारित ओटीपीद्वारे ई-केवायसी पडताळणी करणे अनिवार्य आहे. संघ-आधारित कौशल्यांसाठी सहभागी दोन्ही सदस्यांनी स्वतंत्रपणे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, श्री. रिसे यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790