Amazon

नाशिक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ स्तरावर हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित

नाशिक। दि. ०१ नोव्हेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत 30 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती सादर करण्यासाठी 31 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबर 2026 हा कालवधी निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात नव मतदार व पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव दुरूस्ती करणे व नाव वगळणे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान फॉर्म क्रमांक 6,7 व 8 भरण्यासाठी अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2026 असून मतदारांसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याचे आज महाध्वजारोहण; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा

1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नवमतदारांनी तसेच कोणत्याही कारणामुळे 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीत समावेश न होऊ शकलेल्या सर्व पात्र नागरिकांनी नमुना 6 व घोषणापत्र भरावे. प्रारूप मतदार यादीतील नाव दुरूस्तीसाठी नागरिकांनी नमुना 8 व घोषणापत्र तसेच यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना 7 भरणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना बीएलओ कडून नोटीस प्राप्त झाली असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रे तात्काळ बीएओ यांना सादर करावेत. तसेच Voters.eci.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन कागदपत्रे सादर करता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वज ग्राम परिक्रमेला उत्साहात प्रारंभ; संत-महंतांसह हजारो भाविकांचा सहभाग

असे आहेत हेल्पलाईन क्रमांक
113- नांदगाव, दूरध्वनी क्र. 02552-242032
114- मालेगाव मध्य, दूरध्वनी क्र. 02554-253114
115- मालेगाव बाह्य, मो.क्र.7972480120
116- बागलाण, दूरध्वनी क्र. 02555-223038
117- कळवण, मो.क्र. 8208481669, 7588106863
117- सुरगाणा, मो. क्र. 9923693032, 7720039096
118- चांदवड, मो.क्र. 9403159869, 9922908806
118- देवळा, दूरध्वनी क्र. 02592-228554, 9623263799
119- येवला, दूरध्वनी क्र.02559-299405
120-सिन्नर, दूरध्वनी क्रमांक 02551-220028, 8446320617
121-निफाड, 02550-295174
122- दिंडोरी, मो.क्र 9405824525
122- पेठ, दूरध्वनी क्रमांक 02558-225531
123- नाशिक पूर्व, दूरध्वनी क्रमांक 0253-2310656
124- नाशिक मध्य, दूरध्वनी क्रमांक 0253-2972124
125- नाशिक पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 0253-2232346
126- देवळाली, मो.क्र 9284635369
127- इगतपुरी, दूरध्वनी क्रमांक 02553-244009
128- त्र्यंबकेश्वर, दूरध्वनी क्र. 02594-233355

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790