Amazon

नाशिक: अज्ञात ट्रकच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अपघातानंतर चालक पसार

नाशिक। दि. ०१ नोव्हेंबर २०२६: अंबड परिसरात अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल ज्ञानेश्वर सानप (वय २४, रा. वृंदावननगर, कामठवाडे, अंबड, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण !

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास विठ्ठल सानप हे अंबड एमआयडीसी येथून आपल्या घरी दुचाकीने (एमएच १५ जेएफ ४१८१) जात होते. यावेळी अंबडमधील पॉवर हाऊसजवळ, एक्स्लो पॉईंटकडून गरवारेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या वाहतुकीत महत्वाचे बदल

या अपघातात विठ्ठल यांच्या दोन्ही पायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर संबंधित ट्रकचालकाने जखमी तरुणाला मदत न करता किंवा अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मृताचे भाऊ उमेश ज्ञानेश्वर सानप (वय २१) यांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा आणि पसार झालेल्या चालकाचा शोध घेतला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790