नाशिक(प्रतिनिधी): आज (दि. 2 मे 2020) सकाळी साडे आठ वाजता आलेल्या अहवालानुसार, मालेगाव व्यतिरिक्तही जिल्ह्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. यात शहरातील 6 रुग्णही कोरोनाबाधित झाले आहेत. तर मालेगाव मध्ये आज नव्याने 7 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे मालेगावच्या कोरोना वादळाचा तडाखा आता नाशिकच्या इतर भागात बसायला सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
नाशिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल असलेले रुग्ण:
29 वर्षीय पुरुष, देवळाली, 40 वर्षीय पुरुष, मालपाणी सेफरोन, 60 वर्षीय महिला , सातपूर कॉलनी
54 वर्षीय पुरुष, हिरावाडी, 48 वर्षीय महिला, मनमाड, 39 वर्षीय पुरुष, सिडको, 67 वर्षीय पुरुष, धुळे, 86 वर्षीय पुरुष, सिन्नर, 36 वर्षीय महिला येवला, 54 वर्षीय पुरुष, NCH, नाशिक, 46 वर्षीय पुरुष, चांदवड, देवरगाव, 42 वर्षीय पुरुष, उत्तम नगर,, नाशिक