नाशिक: प्रेयसीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्यास १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

नाशिक। दि. ७ ऑगस्ट २०२५: प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिल्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी बुधवारी (दि.६) १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. प्रमोद गोसावी (३७, इगतपुरी) असे आरोपीचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  मनपाची आज महासभा; विकास कामांसह विविध विषयांवर होणार चर्चा

अभियोग कक्षानुसार, २५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १.२० वाजता जाधव पेट्रोल पंप, पाथर्डी सर्कल, वडनेररोड येथे हा प्रकार घडला होता. प्रमोदचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र प्रेमसंबंध तोडून ती पाथर्डी गाव येथे राहण्यास आली. संतापलेल्या गोसावीने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. सरकार पक्षातर्फे अॅड. भानुप्रिया पेटकर यांनी युक्तिवाद केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790