🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे व खरीप 2023 या कालावधीत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे. या अनुषंगाने वरील कालावधीत बाधित झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या 'इतक्या' वाहनचालकांना ई-चलन; बेशिस्त चालणार नाही !

प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत तसेच खरीप 2023 कालावधीत झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

पोर्टलवर अपलोड केलेल्या यादीतील ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण (E-KYC) केलेले नाही त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक  बँक खाते क्रमांकाशी संलग्न नाही त्यांनी आधार क्रमांक तत्काळ अद्ययावत करून घेवून बँक खाते देखील आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावेत. जेणे करून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतीपीक नुकसानीची रक्कम जमा करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790