नाशिक। दि. ऑक्टोबर २०२६: पेठ मार्गावरील करंजाळीजवळ सावळघाटात भरधाव प्रवासी बसचा (बस क्रमांक: AR20 F5252) अपघात होऊन एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ७ ते ८ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी (दि. ६) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून चार रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आल्या. पोलिस आणि बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू करत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.
जखमी प्रवाशांना उपचारासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
![]()


