Amazon

नाशिक: गुन्हे शाखेची कारवाई : फरार सराईत आरोपी मुंबईतून अटकेत

नाशिक। दि.२७ एप्रिल २०२६: अंबड गुन्हे शाखा युनिट-३ ने गंभीर गुन्ह्यांतील फरार सराईत आरोपी अरबाज मोहम्मद शेख (वय २५, रा. शिवाजीनगर, नाशिक) याला मुंबईतून अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एमपीडीए तसेच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये तो वॉण्टेड होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

पोलिसांच्या माहितीनुसार, अरबाज शेख २०१७ पासून फरार होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि इतर विविध गुन्हे दाखल आहेत. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील विक्रोळी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, २० एप्रिल २०२६ रोजी जुन्या वैमनस्यातून अरबाजने साथीदारांसह गणेश अमरबहादूर बोरा (वय २२, रा. नाशिक) यांच्यावर साईबाबा गार्डन परिसरात हल्ला केल्याची नोंद आहे. या प्रकरणानंतर तो मुंबईत लपून बसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

त्याअनुषंगाने विशेष पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीचा गुन्हेगारी इतिहास अधिक गंभीर असल्याचे समोर येत असून, त्याच्यावर आणखी गुन्हे नोंद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790