नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारी टोळी ताब्यात !

नाशिक। दि. २९ मार्च २०२६ : शहरातील पंडित कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास कोयतेधारी तरुणांच्या टोळीने दहशत माजवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या प्रकरणी धनंजय शेकरे, प्रतीक सोनार (वय १९) आणि पराग जाधव (वय २०) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या संशयितांना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

मिळालेल्या माहितीनुसार, टोळीने वडापावच्या दुकानावर अचानक हल्ला चढवला. या वेळी दुकानातील फ्रीजची तोडफोड करण्यात आली, तर काउंटरवरील काचा फोडून नुकसान करण्यात आले. त्यानंतर बाहेर पडत टोळीने परिसरातील उभ्या वाहनांनाही लक्ष्य केले. हल्लेखोरांनी चार चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. होते. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस हवालदार वाघमारे, प्रदिप म्हसदे, नाझीमखान पठाण, संदिप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, अमोल कोष्टी, चालक पोअं/समाधान पवार, अनुजा येलवे यांच्या पथकाने केली. केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790