नाशिक: अंबड-इंदिरानगरातील तक्रारदारांचा ७० लाखांचा मुद्देमाल परत

नाशिक। दि. ५ एप्रिल २०२६: अंबड, इंदिरानगर पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला ७० लाख १५ हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत देत चेहऱ्यावर हास्य फुलवले. अंबड पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा कौशल्याने तपास करत चोरीच्या विविध गुन्ह्यात लाखोंचा मुद्देमाल ऐवज जप्त केला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने उघडकीस आणलेल्या गुन्हयातील मुद्देमाल फिर्यादींना पोलिस ठाण्यात बोलावुन त्यांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तक्रारदारांना सन्मानाने मुद्देमाल परत देण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना दिले. आहे. दर महिन्याला परिमंडळ १ व २ मधील १४ पोलिस ठाण्यात जप्त केलेला ऐवज अखंडितपणे तक्रारदारांना वाटप केला जात आहे. उपआयुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

१२ गुन्ह्यात ३१ लाख ९३ हजारांचे २३९ ग्रॅम सोने, ४ लाख ४ हजारांचे ३ वाहने, १७ लाख १४ हजारांचे ७९ मोबाईल, १० लाखांची कॉपर वायर, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या ९ गुन्ह्यातील ६ लाख ३ हजारांचा मुद्देमालाचे वाटप केले. तसेच इंदिरनगर ठाण्याच्या हद्दीतील ९ गुन्ह्यातील ६ लाख ३ हजार १६० रूपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790