नाशिक (प्रतिनिधी): एटीएम फोडणाऱ्या भादा टोळीला न्यायालयाने शनिवारी (दि. १७) मोक्का अंतर्गत ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. टोळी प्रमुख मिलनसिंग भादा, गजानन उर्फ भोंदया कोळी, किस्मतसिंग भादा, रा. मोहाडी धुळे असे या शिक्षा झालेल्या टोळीतील आरोपींचे नावे आहेत.
अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, २४ स्प्टेंबर २०१९ रोजी पहाटे खोडेपार्क येथील एटीएम कॅश बॉक्स टायर रोपच्या साह्याने बाहेर काढून पळवून नेतांना बिट मार्शल पोलिसांनी प्रतिकार केला होता. दरोडेखोरांनी पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर झाल्यानंतर न्यायालयाने साक्षीदार, पंच, फिर्यादी आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरुन ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या घटनेतील आरोपी तलवारसिंग जन्नतसिंग भादा, रामसिंग राजुसिंग जुन्नी भोंड, आझादसिंग कृपालसिंग भादा हे मात्र अद्याप फरार आहेत.