नाशिक शहरात या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
नाशिक (प्रतिनिधी): सातपुर विभागातील, त्रंबक रोड, आय.टी.आय. समोर मेघा इंडस्ट्रीज कंपाऊंड लगत 600 मी.मी. व्यासाची शुध्द पाण्याची ग्रॅव्हेटी मेन पाईपलाईनची दुरुस्ती करावयाची आहे.
संपुर्ण पाईप बदलायचा आहे. तसेच गंगापुर डॅम पंपीग स्टेशन रस्त्यावरील उर्ध्ववाहीनी (रायझिंग मेन) पाईपलाईनला गळती सुरु झालेली आहे.
त्यामुळे सदर ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. मुकणे डॅमची 220 के.व्ही फिडर लाईनकरीता (विद्युत वाहिनी) शनिवारी दि. 27/11/2021 रोजी महावितरण यांचे संदर्भिय पत्रान्वये शटडाऊन आहे. नाशिक शहरातील मुख्य पाईपलाईनचे दुरुस्तीचे व देखभाल दुरुस्तीचे व कामे हाती घ्यावयाची असल्याने शनिवार दि. 27/11/2021 रोजी संपुर्ण दिवस नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहील व रविवार दि. 28/11/2021 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
१५ हजार रुपयांची लाच घेतांना अंबड पोलीस ठाण्याच्या पीएसआय आणि शिपायाला अटक !