महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) पाणीपुरवठा नाही..

महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) पाणीपुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील म्हसरुळ व बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र आवारात लिकेज झाल्याने सदरचे काम तातडीने करणे आवश्यक आहे.

सदर उर्ध्ववाहीनीचे दुरुस्ती करणेचे काम शनिवार  दि.14 ऑगस्ट 2021 रोजी हाती घेणेत येणार असल्याने म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरुळ मखमलाबाद लिंकरोडवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण, संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, त्याचप्रमाणे

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठरोड, जकातनाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर इ. तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठरोड, जकातनाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर, डीटीपीनगर इत्यादी परिसरात शनिवार दि.14 ऑगस्ट 2021 रोजीचा सकाळचा,  दुपारचा व  सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि.15 ऑगस्ट 2021 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे.
नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा…
अबब! लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याची संपत्ती ऐकून व्हाल अवाक!
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १२ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिककरांनो शुक्रवारच्या (दि. १३ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790