नाशिक (प्रतिनिधी): शुक्रवारी व शनिवारी चुंचाळे पंपिंग स्टेशन येथे जलवाहिनीला लागलेली गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सातपूर व सिडकोतील काही भागांत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शनिवारी (दि. १८) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
⚡ हे ही वाचा: नाशिक मनपाची मोठी कारवाई; नाशिकरोड, पंचवटी व सिडको परिसरातील ९५ ठिकाणी अतिक्रमण हटविले
सातपूरचा हा भाग प्रभावित होणार:
सातपूरमधील प्रभाग २७ दत्तनगर परिसर, मारुती संकुल परीसर, कारगील चौक, माउली चौक, दातीर वस्ती, मुकेशभाई पटेल शाळा, आनंद वाटिका परिसर, तुळजा भवानी चौक, बुद्धविहार परिसर तर सिडकोतील चुंचाळे घरकुल योजना.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790