नाशिक: त्र्यंबकरोडवरील वाहतुकीत तीन महिन्यांसाठी महत्वाचे बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नाशिक। दि. १० फेब्रुवारी २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी कामांना गती देण्यात येणार असून त्याअंतर्गत त्र्यंबक रोडवर पुढील तीन महिन्यांसाठी वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. खडकाळी सिग्नलपासून ते सातपूर येथील आयटीआय सिग्नलपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहनांची वाहतूक तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, महापालिका व संबंधित ठेकेदार कंपनीला ठराविक अटी व शर्तींच्या अधीन राहून पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दिवसा व रात्री करावयाच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी बंधनकारक राहणार आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून ही अधिसूचना पोलिस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी जारी केली आहे. ही अधिसूचना बुधवार (दि. ११ फेब्रुवारी) पासून ११ मे २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याची अट संबंधित विकासक कंपनीवर घालण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

मेळा बसस्थानक रस्ता पूर्णतः बंद:
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयापासून थेट मेळा बसस्थानकापर्यंतचा किशोर सुधारलया रस्ता देखील या कालावधीत दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शरणपूर रोड तसेच त्र्यंबक रोडवरून या मार्गावर वाहनचालकांना प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भातील अधिसूचना ११ फेब्रुवारी ते ११ मे २०२६ या कालावधीत अंमलात राहणार आहे.

त्र्यंबक रोडवरील कामाचे टप्पे पुढीलप्रमाणे:
१) खडकाळी सिग्नल ते अण्णाभाऊ साठे चौक (जीपीओ रोड)
२) अण्णाभाऊ साठे चौक ते त्र्यंबक नाका सिग्नल
३) त्र्यंबक नाका ते राजदूत हॉटेल
४) राजदूत हॉटेल ते जलतरण तलाव सिग्नल
५) जलतरण तलाव ते धामणकर कॉर्नर
६) धामणकर कॉर्नर ते मायको सर्कल
७) मायको सर्कल ते शरणपूर पोलिस चौकी
८) शरणपूर पोलिस चौकी ते शासकीय दूध डेअरी
९) दूध डेअरी ते बारा बंगला कॉर्नर सिग्नल
१०) बारा बंगला कॉर्नर ते एबीबी सिग्नल
११) एबीबी सिग्नल ते आयटीआय सिग्नल (उद्योग भवन)

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790