महत्वाची बातमी: पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल…

नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या शुक्रवारी (ता.८) जाहीर सभा होत आहे. सभेसाठी शहर-जिल्ह्यातून नागरिकांची मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाचा वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

सदरील बदल हे गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच दि. ७ आणि ८ नोव्हेंबर २०२४ या दोन दिवसांसाठी असणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा तपोवनातील मैदानावर शुक्रवारी (ता. ८) दुपारी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने जारी केलेल्या अधिसूचनानुसार, शहरातील विविध मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तसेच, येणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक मार्गांवर ८ वाहनतळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आपले सरकार केंद्रांमार्फत लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजाणी करावी- आयुक्त कुलकर्णी

गुरुवारी (ता. ७) यासंदर्भात रंगीत तालीमही केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल असतील. तर शुक्रवारी सकाळी १० ते सभा संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल असतील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन उपायुक्त खांडवी यांनी केले आहे.

वणी – दिंडोरी – पेठरोडकडून: पेठ व दिंडोरी रस्त्याने येणारी वाहने आरटीओ सिग्नलमार्गे रासबिहारी चौफुलीवरुन मुंबई-आग्रा महामार्गावरुन निलिगीरी बाग येथील सिद्धीविनायक लॉन्ससमोर पोहोचतील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

मुंबईकडून: मुंबईकडून येणारी वाहने मुंबई नाका – द्वारका -टाकळी फाट्यावरुन ट्रॅक्टर हाउसमार्गे काशी मंगल कार्यालयमार्गे गोदाघाटपर्यंत पोहोचतील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका काही अंशांनी घटला; किमान तापमान तसेच आर्द्रतेत वाढ !

पुणे महामार्गाने येणारे: पुणे, अहमदनगर, शिर्डी, संगमनेर, सिन्नर, पळसे, एकलहरे, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूरमार्गे येणारी वाहने नाशिकरोड रेल्वे पूलाकडून बिटको सिग्नल, जेलरोड-दसक-नांदूर नाका सिग्नलवरुन छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरुन जेजुरकर मळ्यासमोरील जागेत पोहोचतील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

छत्रपती संभाजीनगरकडून: येवला, लासलगाव, निफाड, विंचूर, चांदोरी, सायखेडा, चेहडी, ओढा, लाखलगाव, शिलापूरकडील वाहने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरुन जनार्दन स्वामी मठाजवळील जागेत पोहोचतील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

धुळेकडून: धुळे, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत, ओझरकडील वाहने रासबिहारी-बळी मंदिरमार्गे डाळिंब मार्केट या ठिकाणी पोहोचतील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

हे ही वाचा:  नाशिक: स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या; एकाचा मृत्यू

नाशिक शहर: काट्या मारुती चौकातून उजव्या बाजूने टकले नगर, कृष्णा नगर, तपोवन क्रॉसिंग करुन संतोष टी पॉइंटकडून लक्ष्मी नारायण लॉन्स समोरुन कपिला संगमच्यापुढे वाहने जातील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

दुचाकी वाहनतळ:
नाशिक शहर: दुचाकीने येणारे लक्ष्मी नारायण मंदिरासमोरुन तपोवन रस्त्याच्या उजव्या बाजूने बुटुक हनुमान मंदिर येथील मोकळ्या जागेत उभी करतील. तेथून नागरिक पायी सभास्थळी.

व्हिआयपी पार्किंग: खासदार, आमदार, शासकीय व पोलिस अधिकारी-कर्मचारी त्यांची वाहने साधुग्रामजवळील कमानीच्या उजव्या बाजुकडील मोकळ्या जागेत.

वाहतूक मार्गातील बदल: मुंबई-आग्रा महामार्गावरुन धुळे-मालेगावकडे लहान वाहनांना उड्डाणपुलावरुन मार्गस्थ- मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरसाठी वाहने द्वारकामार्गे बिटको चौक-जेलरोडवरुन नांदूर नाकामार्गे पुढे मार्गस्थ.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790