नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते आहे. त्यात गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तडीपार गुंडांवर नजर ठेवतानाच शहरातील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनच्या उपआयुक्त मोनिका राऊत यांनी ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत ९८ गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात असून ४५ जणांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकांचा काळ असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांना तडीपार करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, उपनगर. सातपर. अंबड इंदिरानगर, देवळाली कॅम्प या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे निवडणुका सुरळीतपणे पार पडू शकण्यास मदत होणार आहे.
🚨 कारवाई करण्यात आलेले गुन्हेगार:
👉 नाशिकरोड पोलिस ठाणे: लहू बबलू काळे (२०, पळसे), दीपक दिनेश फाजगे (३२, देवळाली गाव), निरंक ऊर्फ नाऱ्या ऊर्फ नरेश नागो नरोटे (२२, अरिंगळे मळा), शारिष सुनील कांबळे (२४, गोरेवाडी), गौरव ऊर्फ सोनू सुभाष भागवत (२०, सिन्नर फाटा), नीलेश बाजीराव पेखळे (३९, मोरे मळा), गणेश संजय चव्हाण (२२, पवारवाडी), दाउद सादीक शेख (२०, सुभाषरोड)
👉 सातपूर: प्रतीक राजेश एकडी (२४, श्रमिकनगर), रोशन भगवान भाडमुखे (२१, श्रमिकनगर), मिलिंद पिराजी मुंढे (२१, सातपूर), कल्पेश दीपक वाघ (२६, शिवाजीनगर), सौरव राजेंद्र खरात (२१, स्वारबाबा नगर), गणेश बबन कुन्हे (29, मोरवाडी), वैभव गजानन शिर्के (23, कामटवाडे), नागेश भागवत सोनवणे (38, रा. उपेंद्र नगर), विशाल राजू देवरे (21, पंडित नगर)
👉 उपनगर: पीयूष बाळू शिंदे (२०, देवळाली गाव), बबलू रामधर यादव (२१, सुंदरनगर, देवळाली गाव)
👉 देवळाली कॅम्प मधील रोहित अशोक गायकवाड (२५, लहवित)