नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या वाहतूक मार्गात दोन दिवस (दि. ५ आणि ६ जून) महत्वाचे बदल…

नाशिक। दि. ४ जून २०२६: नाशिक शहरातील महत्वाच्या वाहतूक मार्गात दोन दिवस महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. शहरातील सिद्धेश्वर मंदिर, रामवाडी पूल येथे दोन दिवस (दि. ५ आणि ६ जून) ड्रेनेज पाईपलाइनचे खोदकाम हाती घेण्यात आल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

सिध्देश्वर मंदिर, रामवाडी पुल येथे ड्रेनेजचे पाईपलाईनचे खोदकाम रस्ता क्रॉसिंग करून करण्यात येणार आहे त्यामुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित राहण्याच्या दृष्टीकोनातून वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग:

🚫 प्रवेश बंद मार्ग:
👉 अशोक स्तंभ ते सिध्देश्वर ते मंदिर रामवाडी कडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे.
👉 बायजाबाई छावणी रामवाडी ते अशोक स्तंभ कडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

⤴️ पर्यायी मार्ग:
👉 गुरांचा दवाखाना – अशोकस्तंभ आर. के. – मालेगाव स्टॅण्ड – मार्गे जातील.
👉 बाजयाबाई छावणी – चोपडा लॉन्स – गंगापुर नाका मार्गे जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790