नाशिकचा पारा 41.8 अंशांवर; हंगामातील उच्चांकी कमाल तापमान !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उन्‍हाळ्याच्‍या झळा कायम असून, दुपारी सूर्यकिरणे असह्य वाटू लागली आहेत. त्‍यातच मंगळवारी (ता. २१) नाशिकचे कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्‍या हंगामातील हे उच्चांकी कमाल तापमान आहे. येत्‍या काही दिवसांत उन्‍हाची तीव्रता कायम राहणार असल्‍याचे आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: नाशिक जिल्ह्यात ५० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

यापूर्वी गेल्‍या २८ एप्रिलला नाशिकचे कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यंदाच्‍या हंगामातील हे उच्चांकी तापमान ठरले होते. मात्र आता मंगळवारी कमाल तापमान थेट ४१.८ अंश सेल्सिअसवर पोचले. मार्चपासूनच उन्‍हाळ्याच्‍या झळा जाणवत असून, सध्या तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. कडक उन्‍हामुळे दिवसाच्‍या वेळी शहरासह उपनगरी भागांतील रस्‍त्‍यांवर शुकशुकाट बघायला मिळतो आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

तर काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्‍या नागरिकांकडून उन्‍हापासून बचावासाठी उपरणे, टोपी, स्‍कार्फ आदींची मदत घेतली जाते आहे. यापूर्वीदेखील काही दिवस नाशिकचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले केले होते.

मॉन्‍सूनच्‍या आगमनापर्यंत पारा चढा राहाण्याची शक्‍यता असून, कमाल तापमान चाळीस अंशापेक्षा जास्‍त राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्‍या परिस्थितीत उन्‍हापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला जाणकारांकडून दिला जातो आहे. भरपूर पाणी पिण्याची आवश्‍यकता असून, शक्‍यतो उन्‍हापासून थेट संपर्क टाळण्याचे आवाहनदेखील केले जाते आहे.उकाड्याने नागरिक हवालदिलआधीच तप्त सूर्यकिरणे त्‍यात उन्‍हामुळे उकाडा वाढला आहे. शहर परिसरात मंगळवारी दुपारी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्‍याने उकाड्यात भर पडून नागरिक हवालदिल झाल्‍याचे बघायला मिळाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790