धक्कादायक: नाशिकच्या पाच जणांचा भावली धरणात बुडून मृत्यू…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यात असलेल्या भावली धरणामध्ये पाच जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. भावली धरणावर नाशिकमधील काही जण फिरायला गेले असता त्यांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२१) संध्याकाळी ही घटना घडली असून नाशिकरोड येथून रिक्षेतून धरणावर फिरण्यासाठी काही जण आले होते. त्यातील काही जण धरणात पोहण्यासाठी गेले असता यात पाच जण बुडाल्याचे समजते.

मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश असून हे पाच जण बुडाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. हे सर्व पाच ही जण नाशिकरोड परिसरातील राहणारे असल्याचे समजते असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790