नाशिक। दि. २० जुलै २०२६: खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधन दर विचारात घेवून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत ऑटोरिक्षासाठी सुधारित भाडेदर 6 जुलै 2026 लागू केले आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
असे आहेत सुधारित भाडेदर
किमान 1.5 कि.मी. पहिल्या टप्प्याकरिता रूपये 35/- (पूर्वीचा दर रूपये 27/-) व पुढील प्रत्येक कि.मी. साठी रूपये 23/- (पूर्वीचा दर रूपये 18/-) असे आहेत.
ऑटोरिक्षा परवानाधारकांनी भाडेमीटरचे रि-कॅलिब्रेशन 6 जुलै 2026 पासू 5 सप्टेंबर 2026 पर्यत करून घेणे आवश्यक आहे. भाडेमीटरचे रि-कॅलिब्रेशन उपरोक्त कालावधीत केले नाही, तर मागील टॅरिफ कार्ड 5 सप्टेंबर 2026 पर्यंतच अनुज्ञेय राहील,असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


