नाशिक: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्याला अटक !

नाशिक। दि. २० जुलै २०२६: अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीतागुंफा येथे ही कारवाई केली. चिराग संतोषसिंग परदेशी असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा 'यलो अलर्ट'

पथकाचे हेमंत तोडकर यांच्या पथकाचे संजय सानप, शंकर काळे यांना उपनगर पोलिस ठाण्यात दाखल पोक्सो गुन्ह्यातील संशयित चिराग परदेशी हा सितागुंफा येथे आल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. संशयिताला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790