नाशिक (प्रतिनिधी): तपोवनातील केवडीबनातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात गुरुवारी (दि. ३१) संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान नाशिक स्वामिनारायण मंदिराचे कोठारी महाव्रत स्वामीजी व महंत वरिष्ठ संत यज्ञस्वरूप स्वामीजींच्या हस्ते लक्ष्मी पूजन व चोपडी पूजन करण्यात येणार आहे.
शनिवारी (दि. २) दिवाळी पाडवा, नूतन वर्षानिमित्त सकाळी ६.४५ वाजता वैदिक मंत्रोच्चारात महापूजा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत गोवर्धन पूजा व थाळगान करून भव्य अन्नकूट (नैवेद्य) भगवान स्वामिनारायण तसेच मंदिरातील विविध भगवंतांना अर्पण करण्यात येणार आहे.
यानंतर सर्व भाविकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अन्नकूट दर्शन घेता येईल. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


