नाशिक: दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूररोड येथे मित्राच्या फ्लॅटवर अभ्यास करून दुचाकीने घरी जाताना त्र्यंबकरोडवर बांधकाम भवनसमोर दुचाकी घसरून दुभाजकावर आदळली. शुक्रवारी मध्यरात्री २.३० वाजता झालेल्या या अपघातात कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेणारे अभिजित मराठे (२३, रा. दामोदरनगर, पाथर्डी फाटा), मयूर कावरे (२३, रा. सावतानगर) या दोन मित्रांचा मृत्यू झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गंगापूर धरण ६१% भरले; गतवर्षीपेक्षा ३६.८% जास्त

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजित व मयूर यांचे बुधवार (दि. ३०) पासून आयटीचे पेपर असल्याने ते गंगापूररोडवरील मित्राकडे नेहमीप्रमाणे अभ्यासाला गेले होते. रात्री २.३० वाजता दुचाकीने घरी परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहनासह दोघेही दुभाजकावर आदळले.

👉 हे ही वाचा:  नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. इतर वाहनचालकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी दोघांची ओळख पटवली. मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट...

दोघे मित्र एमसीएच्या शेवटच्या वर्षाला होते. शनिवारी (दि. २६) आयटीचा प्रोजेक्ट जमा करायचा असल्याने त्यांनी रात्री उशिरापर्यंत मित्राकडे अभ्यास केला. परतताना सीबीएस येथे चहा घेऊन ते घरी जाण्यास निघाले होते मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790