news

नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे

नाशिक। दि. ६ फेब्रुवारी २०२६: नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली. महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आडके यांची निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  आखाती युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून ESMA लागू

महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिमगौरी आडके यांची महापौर म्हणून निवड केली तर उपमहापौर म्हणून विलास शिंदेंची निवड केल्याचे जाहीर केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790