नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर येथील सात महिन्यांच्या बाळावर अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये सात महिन्यांच्या बाळावर मज्जातंतू संक्रमण शस्रक्रिया यशस्वी झाली. त्यामळे हे बाळ एका हाताने कायमचे अपंग होण्यापासून वाचले. लहान मुलांचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल चल्लावार, मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंदन मोहंती आणि भुलतज्ञ डॉ. भूपेश पराते यांच्या टीमने ही अवघड आणि गुंतागुंती शस्रक्रिया यशस्वी केली.
लहान मुलांचे अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल चल्लावार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बाळाच्या जन्मावेळी किंवा प्रसूतीच्या वेळी बाळाच्या शरीराला मुख्यत्वे मज्जातंतू आणि हात यांमधील नसांना इजा होण्याची शक्यता असते. अशावेळी नसांची गुंतागुंत वाढून बाळाचा हात कायमचा निकामी होण्याची शक्यता असते, सिन्नर येथील बाळचा हात हा अशाच प्रकारे दुखावला जाऊन हाताची हालचाल होत नसल्याने बाळाला डॉक्टरांकडे आणण्यात आले, डॉक्टरांनी सुरुवातीला हाताचा व्यायाम तसेच काही औषधोपचार करण्याचा सल्ला दिला ,साधारण तीन महिने व्यायाम आणि औषधोपचार सुरू ठेवले परंतु हाताची हालचाल होत नसल्याने शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला ही शस्रक्रिया बाळाच्या जन्माच्या नऊ महिन्यांच्या आत केल्यास त्याचा फायदा चांगला होतो या शस्रक्रियेला Brachial plexus Neurotization असे म्हणतात ही अत्यंत गुंतागुंतीची शस्रक्रिया असून मायक्रोस्कोप खाली केली जाते.
अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले कि “अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांची टीम, शस्रक्रियेनंतर आवश्यक असलेली अतिदक्षता विभागातील काळजी, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ या सगळ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने अशा अवघड आणि क्लिष्ट शस्रक्रिया करता येतात आणि त्या यशस्वी होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे.”
“महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये अशा शस्रक्रिया होत असतात आणि त्यासाठी खर्च देखील खूप जास्त असतो. परंतु या अवघड आणि क्लिष्ट शस्रक्रिया अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये करता येत असून त्याचा खर्च देखील इतर शहरांच्या तुलनेत कमी येतो, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, मालेगाव, संगमनेर येथील रुग्णांना देखील इतर ठिकाणी जाण्यापेक्षा नाशिकमध्येच उपचार आणि शस्रक्रिया करणे सोयीचे होते. लहान मुलांचे अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील चल्लावार, मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंदन मोहंती आणि भुलतज्ञ डॉ. भूपेश पराते यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो.”