नाशिक: अनामिक सेवाभावी संस्थेद्वारे उद्या (दि. २६) शहरामध्ये संविधान गौरव यात्रेचे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): अनामिक – मी भारतीय प्रथमतः आणि अंतिमत: हे ब्रीदवाक्य घेऊन अनामिक सेवाभावी संस्था गेली पाच वर्षे सातत्याने संविधान गौरव यात्रेचे आयोजन करत आहे, तसेच याही वर्षी उद्या दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान गौरव यात्रा आयोजित केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हा रूग्णालय डॉक्टर्स संघ ठरला क्रिकेट करंडकाचा मानकरी !

या यात्रेमध्ये विविध शाळा, कॉलेज व शहरातील विविध वस्त्या, संस्था सहभागी होतात. या गौरव यात्रेची सुरुवात सकाळी ७.३० वाजता भोसला भवन येथून सुरू होऊन कॉलेज रोड मार्गे संविधान चौक (कृषीनगर चौक) येथे समारोप होतो.

संविधान विषय जनजागृती व्हावी हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान अनामिकचे अध्यक्ष सागर सोनवणे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790