नाशिक (प्रतिनिधी): शहरात विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार- व्यापारी संघटनांच्या मोर्चे धरणे, निदर्शने बंद पुकारणे, आंदोलनामुळे वेगवेगळ्या मुद्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिस आयुक्तालयाने १९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शहरात मनाई आदेश लागू केला आहे.
याबाबतच्या अधिसूचनेत म्हटले की, प्रजासत्ताक दिन तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व नेते यांच्या बैठका सुरू आहेत. या घटनांचे पडसाद उमटू नये याकरिता या कालावधीत शस्त्र बाळगणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रदर्शन व दहन करणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे, आवेशपूर्ण भाषण करणे, वाहनांना धोकादायक झेंडे लावणे, रॅली काढणे, पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवणे याला सक्त मनाई असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.