नाशिक: ३० हजार लोकवस्तीच्या भागात पाण्याची समस्या; कमी दाबाने पाणी

नाशिक (प्रतिनिधी): पिण्याच्या पाण्यासाठी दिवाळीपूर्वी पालिकेवर हंडा मोर्चा काढणाऱ्या सातपूरकर महिलांना तेव्हा १५ दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अद्यापही सातपूर गावठाणसह महादेवनगर, कॉलनी परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे ३० हजारहून अधिक वस्ती असलेल्या या भागात महिलांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने आता महिलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट दुर्घटना; महिला गंभीर जखमी

महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासह जलकुंभावर गेल्या १५ दिवसांपूर्वी सातपूर परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी व्हॉल्व्हमनसह पाणीपुरवठा विभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराव घालण्यात आला. मात्र, दिवाळीत पुरेशा पाणीपुरवठ्याचे आश्वासन करण्यात आल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. परंतु, प्रत्यक्षात दिवाळी उलटूनही १५ दिवसांपासून पाणी कमी दाबानेच येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उंच भाग असल्याने समस्या असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी जलवाहिन्यांची पाहणी करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. येत्या आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास पालिका मुख्यालयावरच आंदोलन करण्याचा इशारा महिलांकडून देण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790