
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलिस व युवा शक्ती फाउंडेशनने घेतलेल्या आलेल्या रोजगार मेळाव्यात ५१३ युवकांनी हजेरी लावली. कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यापैकी ४३१ जणांची प्राथमिक चाचणीत त्यांची निवड केली.
शहर पोलिस आयुक्तालयात झालेल्या या मेळाव्यात २२ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या कंपन्यांत १,३२५ रिक्त जागा होत्या. परंतु सर्वच जागांवर अपेक्षित उमेदवार मिळू शकले नाहीत. मेळाव्यात सहभागी झालेल्या ५१३ बेरोजगार युवक युवतींपैकी ४३१ जणांना २२ आस्थापनांमध्ये प्राथमिक नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी सर्व पोलिस उपायुक्त आणि विविध ठाण्यांचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
यांना मिळाली मेळाव्यात संधी:
दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, वेल्डर, फीटर, टर्नर, मशीन ग्राइंडर, शीटमेटल, ऑटोमोबाइल इंजिनिअर, डिग्री, डिप्लोमा, बीए, बीकॉम, बी.एस्सी., एम.एस्सी., एमबीए, फार्मसी अशा सर्वच शा.खांच्या उमेदवारांना येथे संधी मिळाली
आता दर तीन महिन्यांनी मेळावा:
आता त्रैमासिक रोजगार मेळावे भरवून तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिल्या जातील. फाउंडेशननेही अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना मेळाव्यात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावे. पोलिसांतर्फे अधिकाधिक कंपन्यांना मेळाव्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करू. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त