नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत. ज्या मुलांनी शिक्षण, कला, संस्कृती कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करण्याऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 30 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांना प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या पुस्कारासाठी मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अशा मुलांचे प्रस्ताव स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी/ जिल्हा दंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था अर्ज करू शकतात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.