नाशिक। दि. १० ऑक्टोबर २०२५: महावितरण प्रशासनाने २२ सप्टेंबरपासून पुनर्रचना प्रस्तावाची कृती समितीमध्ये सहभागी संघटनांनी दिलेल्या सूचना व प्रस्तावाचा कोणताही अंतर्भाव केला नाही. एकतर्फी अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले.
या विरोधात कृती समितीने आंदोलनाचे आठ टप्पे पार करून नववा टप्पा सुरू केला आहे. त्यानुसार गुरुवारपासुन (दि. ९) नाशिकरोड येथील विद्युत भवनाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
महावितरणची पुनर्रचना ही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन व तांत्रिक कामगार युनियन ५०५९ या संघटनांचे सभासद व पदाधिकारी यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या पुनर्रचनेला विरोध केला आहे. याबाबत महावितरण प्रशासनासोबत चर्चाही केली. मात्र प्रशासन आपल्या कृतीवर ठाम असल्याने या संघटनांच्या कृती समितीने आंदोलन केले.
![]()
