नाशिक। दि. ०७ ऑक्टोबर २०२५: दिवाळीच्या निमित्ताने पंचवटीत दरवर्षी फटाका स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांसाठी सोमवारी (दि. ६) मनपा पंचवटी विभागीय कार्यालयात फटका विक्री गाळे लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. विभागीय कार्यालयात फटका विक्री गाळे लिलावात एकूण ६४ पैकी ५२ गाळ्यांची लिलाव प्रकिया पूर्ण झाली. उर्वरित १२ गाळ्यांचा लिलाव तहकूब झाला असून, या सर्व उर्वरित गाळ यांचा लिलाव आज मंगळवार (दि. ७) विभागीय कार्यालयात दुपारी दोन वाजता होणार आहे, अशी माहिती पंचवटी विभागीय अधिकारी मदनचंद्र हरिश्चंद्र यांनी दिली.
मनपा विभागीय कार्यालयात झालेल्या फटाका विक्री गाळे लिलावात भाग घेण्यासाठी फटाका विक्री व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती. लिलावात भाग घेण्यासाठी टोकन असलेल्यांना प्रवेश दिला होता. पंचवटी प्रशासकीय अधिक्षक मंगेश वाघ, मिळकत जाहिरात आणि परवाने विभाग सहा. अधीक्षक भूषण देशमुख यांनी लिलावाचे नियम, अटीशर्थीचे वाचन व बोली प्रक्रिया राबवून उपस्थित फटाका विक्री गाळेधारकांना आवश्यक मार्गदर्शन केले, तर फटाका विक्री गाळे लिलावाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.
![]()


