धोत्रे खून प्रकरण : उद्धव निमसेंच्या जामीन अर्जावर १० ला सुनावणी

नाशिक। दि. ०७ ऑक्टोबर २०२५: राहुल धोत्रे खून प्रकरणात कारागृहात असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या जामीन अर्जावर दि. १० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सोमवारी (दि. ६) न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या भागांत गुरुवारी (दि. ११ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

खून प्रकरणात दि. १५ सप्टेंबर रोजी निमसे नाट्यमयरित्या गुंडाविरोधी पथकाच्या कार्यालयात शरण आले होते. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली, कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी अंतर्गत त्यांची कारागृहात रवानगी झाली. त्यामुळे २१ दिवसांपासून निमसे कारागृहात आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790