नाशिक। दि. ६ ऑक्टोबर २०२५: महापालिका व अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयाने गोदावरी महास्वच्छता अभियानाअंतर्गत २५० कर्मचाऱ्यांनी ७०० किलो कचऱ्याचे संकलन केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतकमहोत्सवाचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडाचा समारोप मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, उपायुक्त अजित निकत, उपायुक्त गोदावरी संवर्धन नितीन पवार, अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जीवन सोनवणे आदी उपस्थित होते.
महास्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून जुने भाजी बाजार रामकुंड, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, अमरधाम ते स्वामी नारायण मंदिर, गणेशवाडी मार्केट, तपोवन घाट परिसरात मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत प्लॅस्टिक, निर्माल्य व कचरा संकलित करण्यात येऊन रस्ते व घाट परिसर अग्निशमन विभागाने फायरमन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पाण्याच्या फवाऱ्याने धुतले. पुरामुळे आलेला गाळ व चिखल साफ केला.
![]()
