नाशिक: बाबाज थिएटर्सचा ‘पुष्प ६७’ कार्यक्रम; ‘बेस्ट ऑफ गुलजार’ची मेजवानी

नाशिक। दि. १ जून २०२६: बाबाज थिएटर्सतर्फे ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी दरमहा आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत मैफल व ‘कृतज्ञता सन्मान पुरस्कार’ सोहळ्याच्या मालिकेतील ‘पुष्प ६७’ हा विशेष कार्यक्रम मंगळवार, २ जून रोजी सायंकाळी ६.१५ ते ९ या वेळेत कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

या कार्यक्रमात नाशिक डिस्ट्रिक्ट ऑर्केस्ट्रा असोसिएशन प्रस्तुत ‘बेस्ट ऑफ गुलजार’ ही संगीतमय मैफल रंगणार असून, सुप्रसिद्ध गायक उमेश गायकवाड, प्रशांत चंद्रात्रे, श्रीनिवास सोनवणे, आना कांबळे, प्रियांका कोठावदे आणि अपर्णा माडीवाले हे आपल्या सुरेल गायकीतून गुलजार यांच्या अजरामर गीतांचा नजराणा रसिकांसमोर सादर करणार आहेत. तसेच ज्येष्ठ निवेदक अमर भोळे हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून गुलजार यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

सचिन शिंदे यांच्या ध्वनी संयोजनाखाली प्रशांत महाले, अभिजीत शर्मा, फारूक पिरजादे, निलेश सोनवणे, आनंद शहाणे आणि सुनील साळवे हे वादक साथसंगत करणार आहेत.

याच कार्यक्रमात नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तीन मान्यवर कलाकारांचा ‘कृतज्ञता सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मनीष बस्ते उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

यंदाच्या पुरस्कारासाठी श्री. निलेश देशपांडे (सांस्कृतिक/कला), श्री. कृष्णा मरकड (सांस्कृतिक/कला) आणि तन्वी अमीत (कला, साहित्य व लेखन) यांची निवड करण्यात आली आहे.

या विशेष कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे, डॉ. अतुल पुराणिक, कैलास पाटील, जे. पी. जाधव, शामराव केदार, दिलीपसिंह पाटील आणि योगिता पाटील यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790