नाशिक: ‘सावाना’तर्फे आज (दि. २०) स्वर ‘स्वर-सावाना’चे २३ वे पुष्प

नाशिक। दि. २० जून २०२६: सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘स्वर-सावाना’ या लोकप्रिय सांस्कृतिक-संगीत उपक्रमाचे २३ वे पुष्प शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  वाहनधारकांनो लक्ष द्या... PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

‘राग-रंग’ या संकल्पनेवर आधारित लोकप्रिय रचनांची मैफल या कार्यक्रमात रसिकांना अनुभवता येणार आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार तसेच अभिजात संगीताची जपणूक करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘स्वरसावाना’ या मासिक सांस्कृतिक उपक्रमाने आनंद निर्माण केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून अतुल पुराणिक व सौ. दुहिता अतुल पुराणिक उपस्थित राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

या कार्यक्रमात संगीत मार्तंड पं. जसराज यांचे शिष्य प्रसिद्ध गायक श्री. प्रसाद दुसाने यांचे गायन होणार असून त्यांना हार्मोनियमवर अमित तांबे, तबल्यावर ओंकार भुसारे, पखवाजवर कृष्णा नवगिरे आणि बासरीवर मयूर विठोभे यांची साथ लाभणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू, स्वर सावाना प्रमुख प्रशांत जुन्नरे आदींनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790