नाशिक: तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर आज (दि. १५) उच्च न्यायालयात सुनावणी

नाशिक। दि. १५ जुलै २०२६: तपोवन परिसरातील कथित वृक्षतोड प्रकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज (बुधवार, १५ जुलै) सुनावणी होणार असल्याची माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते तसेच मनसेचे उपशहरप्रमुख अॅड. नितीन पंडित यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

अॅड. पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरासह नाशिक शहरातील शेकडो झाडांची बेकायदेशीरपणे तोड केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असतानाही तसेच मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांकडे दुर्लक्ष करून महापालिकेकडून तपोवन परिसरासह शहरातील विविध भागांत घाईघाईने वृक्षतोड सुरू असल्याचा आरोपही अॅड. पंडित यांनी केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790