नाशिकमध्ये आज (दि. १७ नोव्हेंबर) रंगणार ‘झिलमीलाते सीतारों की मैफिल

नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२६: संगीतप्रेमींसाठी एक सुरेल संध्याकाळ अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अफलातून म्युझिक लव्हर्स आणि सेन्सेशनल म्युझिकल इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रौप्य महोत्सव (भाग २५) : झिलमीलाते सीतारों की मैफिल’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आजपासून मनपाची धडक कारवाई; थेट गुन्हे दाखल होणार

मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता इंदिरा नगर येथील बापू बंगला परिसरातील स्वर्णिमा सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या मैफिलीत नाशिकमधील नामवंत गायक कलाकार आपल्या सुमधुर आवाजातून विविध गाण्यांची सुरेल मेजवानी सादर करणार आहेत.

संगीतप्रेमींना जुन्या आणि लोकप्रिय गीतांच्या सुरेल आठवणींमध्ये रमण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्या मित्रपरिवारासह आणि कुटुंबीयांसोबत या संगीत मैफिलीचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १ लाख ५१ हजार पणत्यांतून साकारली भव्य प्रतिकृती

कार्यक्रमाचा तपशील :

  • कार्यक्रम : रौप्य महोत्सव (भाग २५) – झिलमीलाते सीतारों की मैफिल
  • दिनांक : मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ६ वाजता
  • स्थळ : स्वर्णिमा सभागृह, बापू बंगला, इंदिरा नगर, नाशिक
  • आयोजक : अफलातून म्युझिक लव्हर्स आणि सेन्सेशनल म्युझिकल इव्हेंट्स

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790