HomeAd

नाशिक: शस्त्राचा धाक दाखवत बळजबरीने लुट; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): धारदार शस्त्राचा धाक दाखवित एकास लुटल्याची घटना वडाळागावातील साठेनगर भागात घडली. या घटनेत बळजबरीने रोकड काढून पोबारा करणा-याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होतोय? तक्रार कुठे कराल, कशी कराल – जाणून घ्या सविस्तर...

शौकत सुपडू शहा (रा. निंबाच्या झाडाजवळ, साठेनगर वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत कलीम नसीर शहा (३७ रा. पिंपळाच्या झाडाजवळ साठे चौक वडाळागाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०३२५/२०२३) शहा मंगळवारी (दि.७) रात्री आपल्या घराजवळील निंबाच्या झाडाजवळ उभे असतांना संशयिताने त्यांना गाठले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सेवायोजन कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी

यावेळी संशयिताने धारदार शस्त्राचा धाक दाखवत व दमदाटी करीत त्यांच्या खिशातील सुमारे ३ हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरी काढून पोबारा केला होता. याबाबत कलीम शहा यांनी पोलिसात धाव घेताच पोलिसांनी संशयितास हुडकून काढले असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक खरोटे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790