नाशिक: चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला अटक

नाशिक। दि. १७ सप्टेंबर २०२६ : चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको परिसरात आलेल्या १८ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला वाहनचोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.

वेदांत संजय वावरिया (वय १८, रा. गिते मळा, शताब्दी हॉस्पिटलच्या मागे, हेरिबेअर सोसायटीजवळ, मुंबई नाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वर दर्शनाहून परतताना इर्टिगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, सहा जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पथक वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील संशयितांचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना एक तरुण चोरीचे वाहन विक्रीसाठी सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चॉपरचा धाक दाखवत गणेश मंडळाकडून हप्ता वसुलीचा प्रयत्न; पाच दुचाकींची तोडफोड

ही माहिती युनिट क्रमांक दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी संभाजी स्टेडियम परिसरात सापळा लावला. काही वेळाने संशयास्पदरीत्या तेथे आलेल्या वावरियाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने अॅक्टिव्हा मोपेड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. या वाहनचोरीप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेला गुन्हा तपासात उघडकीस आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम; आधार माहिती अद्यावत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ताब्यात घेतलेल्या संशयितासह जप्त वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि अतुल पाटील यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790