नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
इमारतीच्या पार्किंगमध्ये महिलेला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): इमारतीच्या पार्किंगमध्ये महिलेला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी खंबाळ्यातून (ता. त्र्यंबकेश्वर) अटक केली आहे. मयुर गजानन वांद्रेकर (२६, रा. यशोधन, शिवाजीनगर, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे.
कार्तिकी अंबादास आहिरे (रा. दर्शिल अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, २३ तारखेला रात्री आठच्या सुमारास त्या पार्किंगमधून जात असताना अंधारात लपून बसलेल्या संशयित मयुर याने चाकूचा धाक दाखवून १० हजारांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल होता.
गंगापूर पोलिस तपास करीत असताना संशयित मयुर खंबाळ्यात लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून खंबाळ्यातील पारदेश्वर मंदिरातून अटक केली. न्यायालयाने त्यास एका दिवसाची कोठडी सुनावली आहे.
त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय भिसे, अंमलदार सुजित जाधव, गिरीश महाले, गणेश रेहेरे, सोनू खाडे यांनी कामगिरी केली.