Breaking: नाशिक हादरलं… सहा जणांचा हल्ला; दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याचा खून

नाशिक (प्रतिनिधी): शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आठवडाभरा पूर्वी शहरातील अंबड परिसरात एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाही तोवरच पुन्हा एकदा शहरातील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील एक भाजी विक्रेत्यावर अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे…

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप आठवले (२२) असे हत्या केलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने २५ पेक्षा जास्त वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचे सत्र घडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790