🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: मोलकरणीचा साडे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मोलकरणीने मालकाच्या घरावर डल्ला मारत ३ लाख ४५ हजाराचे दागिने लंपास केले. धुणी भांडी करण्यासाठी कामावर ठेवलेल्या मोलकणीने कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत ही चोरी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त वाहतूक मार्गांत ३ दिवस बदल

याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण महेश वाघरी उर्फ डाबी असे संशयित मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी अलका प्रणव जांभेकर (रा.जय व्हिला,स्नेहजीवन कॉलनी कॅनडा कॉर्नर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जांभेकर यांनी संशयित तरूणीस घरातील धुणी भांडी करण्यासाठी कामास ठेवले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बिल्डर नरेश कारडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान सदर तरुणीने कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत अलंकार लांबविले. या तरुणीने सुमारे ३ लाख ४५ हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790