Amazon

नाशिक: चार जणांच्या टोळक्याचा तरूणावर प्राणघातक हल्ला…

नाशिक (प्रतिनिधी): तिवंधा चौकात कुठलेही कारण नसतांना चार जणांच्या टोळक्याने एका तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत हॉकी स्टीकने मारहाण करीत तरूणावर कोयत्याने वार करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

तुषार काळे, बन्या उर्फ रोशन दिघे, संतोष रांगडे व रोषनचा चुलत भाऊ अशी युवकावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत वैभव प्रभाकर दाते (३१ रा. रेणूका रेसि.शिवकृपा नगर,हिरावाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. दाते रविवारी (दि.८) तिवंधा चौक परिसरात गेला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

बुधा हलवाई दुकनासमोरून तो पायी जात असतांना टोळक्याने त्याची वाट अडवित कुठलेही कारण नसतांना त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी माराहाण केली. यावेळी बन्या दिघे याने हॉकीस्टीकने तर तुषार काळे याने कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790