नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून एकाने युवतीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत गर्भपात करीत संशयिताने लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅसलाइन बिल अपडेटच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक; नाशिकमध्ये ४.०७ लाखांचा गंडा

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल ताराचंद वाघचौरे (२८) असे संशयिताचे नाव आहे. सिडको परिसरात राहणा-या युवतीने याबाबत फिर्याद दिली. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात प्रेमसबंध होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांमध्ये शरिरसंबध झाले. यातून पीडिता गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी

तरूणीने त्यानंतर संशयिताकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने विवाहास नकार दिल्याने हा प्रकार पोलीस दफ्तरी पोहचला असून पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५९२/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790