नाशिक: ट्रॅफिक वॉर्डनच्या कानशिलात लगावली; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक। दि. १८ नोव्हेंबर २०२६: शहरातील दत्तमंदिर पॉईंट येथे वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाहनचालकाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ट्रॅफिक वॉर्डन कुणाल संदीप लगरे (रा. उंटवाडी, सेंट्रल पार्क, अंबड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल लगरे, पोलीस हवालदार संदीप भाबड तसेच ट्रॅफिक वॉर्डन कुणाल अढांगळे आणि भावेश माने हे दत्तमंदिर पॉईंट येथे वाहतूक नियमनाचे काम करीत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी १९ व २० नोव्हेंबर रोजी विशेष अभियान

यावेळी पपया नर्सरीच्या दिशेने एमएच १५ जीए १२०२ क्रमांकाची अॅक्सिस गाडी आली. या गाडीवरील चालक संशयित उमेश जाधव (वय २९, रा. केवल पार्क, अंबड) याने ट्रॅफिक काढण्याच्या कारणावरून कुणाल लगरे यांच्या कानशिलात लगावली. तसेच त्यांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर पोलिसांनी उमेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790