नाशिक: दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावला; गुन्हा दाखल

नाशिक। दि. २३ एप्रिल २०२६: शहरात दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावण्याच्या घटना पुन्हा समोर येत असून, अशाच प्रकारात एका कर्मचाऱ्याचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षलकुमार बागड हे दि. २१ एप्रिल रोजी रात्री नोकरीच्या ठिकाणी नाईट शिफ्टमध्ये होते. रात्री सुमारे ९.१५ ते १० वाजेच्या जेवणानंतर ब्रेकदरम्यान ते साखलाज फर्निचर मॉल ते संदिप हॉटेल परिसरात ते पायी फेरफटका मारत मोबाईलवर बोलत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

दरम्यान, ब्रेक संपत आल्याने ते पुन्हा कार्यालयाकडे परतत असताना संदिप हॉटेलकडून गडकरी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील सुमारे ४० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. (मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक: १९५/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790