नाशिक (प्रतिनिधी): गल्लीत राहयचे असेल तर एक लाखांची खंडणी द्यावी लागले, अशी धमकी देत सराईताने किराणा व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करत कारची तोडफोड केल्याचा प्रकार सराफ बाजारात घडला. संशयिताच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज उर्फ राज जगदीश जंगम असे या संशयिताचे नाव आहे. संशयित फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
राहुल तिवारी (वय: ४२, रा. तिळभांडेश्वर मंदिर, सराफ बाजार) यांच्या तक्रारीनुसार परिसरात त्यांचे किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकान होते. संशयित दुकानावर येऊन किराणा माल, अन्य वस्तू बळजबरीने घेऊन जात होता. भीतीपोटी तक्रार केली नाही. संशयिताने घरी येत इथे राहायचे असेल तर १ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली.
उद्या सकाळपर्यंत पैसे दिले नाही तर जीव घेतो, अशी धमकी देऊन निघून गेला. रात्री पुन्हा घराजवळ येऊन घरावर दगडफेक व थार गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार थेटे करत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८४/२०२४)